झी मराठी वाहिनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अण्णा नाईक परत येणार, लवकरच…! अशी घोषणा केली आहे.यासोबतच त्यांनी अण्णांचा एक मोशन पोस्टर देखील शेअर केला आहे. यापार्श्वभूमीवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचा तीसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार दिसत आहे.
मालिकेच्या शेवटच्या भागात अण्णा आणि शेवंताचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अण्णा पुन्हा एकदा कसे येणार? ही उत्कंठा आता प्रेक्षकांना लागली आहे.