मनोरंजन

‘शेर शिवराज'ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई...

Published by : Saurabh Gondhali

चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका केलेल्या आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून,या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पावनखिंड चित्रपटाप्रमाणे हा चित्रपट बक्कळ कमाई करतो हे पहावे लागणार आहे.

काही वर्षांपूर्वी दिग्पालने (digpal lanjekar) छत्रपती शिवाजी महाराजांवर 'शिव अष्टक' ही चित्रपट मालिका करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यातील चार चित्रपट प्रदर्शित झाले असून आता पाचव्या चित्रपटाचे वेध लागले आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज (sher shivraj) असे हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पावनखिंड हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात रिलीज झाला होता. या चित्रपटानेही विक्रमी कमाई केली. त्यानंतर लगेचच म्हणजे २२ एप्रिल रोजी 'शेर शिवराज' हा चित्रपट प्रदर्शित करण्यातआला. विशेष बाब म्हणजे अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने यशाची मोहर उमटवली आहे.

ट्रेड ऍनालिस्ट (trad analyst) तरन आदर्श (taran adarsh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २२ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होताच या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. एका दिवसात १. ०५ करोड रुपये (1.05 cr ) इतकी कमाई झाली. शिवाय सर्व शो हाउसफुल्ल झाले असून प्रेक्षकांचा वाढत प्रतिसाद पाहून या चित्रपटाला चित्रपटगृहाने लहान चित्रपट गृहातून मोठ्या चित्रपटगृहात शिफ्ट केले आहे. तसेच सर्व शो ऍडव्हान्स मध्ये हाऊसफुल्ल झाले आहेत. मराठी चित्रपटाच्या यशातील हा एक महत्वाचा चित्रपट आहे,' असे ट्विट त्यांनी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा