मनोरंजन

Ira Khan : आमिर खानच्या लेकीची हळद, पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नींचा मराठमोळा अंदाज

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. याच हळदीच्या कार्यक्रमात आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी मराठमोळ्या लूकमध्ये दिसून आल्या होत्या.

Published by : Team Lokshahi

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानचा हळदीचा कार्यक्रम आहे. ३ जानेवारी रोजी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. नुकताच हळदी समारंभाच्या कार्यक्रमात अभिनेता आमिर खानच्या दोन्ही माजी पत्नी किरण राव आणि रीना दत्ता यांनी मराठमोळी नऊवारी साडी नेसली होती. इरा आणि नुपूर मराठमोळ्या रितीनुसार लग्न करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

इरा खान आणि नुपूर शिखरेंच्या हळदी समारंभात रीना आणि किरण लेकीच्या हळदीसाठी मराठमोळ्या नऊवारी साडीमध्ये होणाऱ्या जावयाच्या घरी पोहोचले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये किरणने डोक्यात गजरा, जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा लूक केला आहे. तर आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता हिरव्या नऊवारी साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

कोण आहे नुपूर शिखरे?

नुपूर शिखरे हा व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नुपूर इराला ट्रेन करत आहे. इराने ट्रेनिंग दरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुपूर फक्त इरालाच नाही तर परफेक्शनिस्ट आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा