मनोरंजन

रेमो डिसूझाच्या मेव्हण्याची राहत्या घरात आत्महत्या

Published by : Lokshahi News

बॉलिवूडमधून प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा याचा मेहूणा आणि त्याच्या पत्नीचा भाऊ जेसन वॉटकिन्सने जगाचा निरोप घेतला आहे. तो त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. जेसन वॅटकिन्सच्या निधनाने लिझेल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

जेसन वॅटकिन्स त्यांच्या मुंबईतील घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की जेसनला कूपर रुग्णालयात आणले आणि ओशिवरा पोलीस आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत. मात्र, रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझा यांनी मृत्यूला दुजोरा दिला आहे.

लिझेलच्या भावाच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आले नसून समोर येत असलेल्या माहितीनुसार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लिझेल डिसूझाने तिच्या भावाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्राम स्टोरीवर पहिला फोटो शेअर करताना लिझेलने, 'का…? तू माझ्याशी हे कसे करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही, असे म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...