अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांना Southwestern American University च्या वतीने मराठी साहित्य केलेल्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना मानद डॉक्टरेट उपाधीने चेन्नई येथे सन्मानित करण्यात आले. गेली ३२ वर्ष श्री गोरे हे साहित्य संवर्धनाचे कार्य करीत आहेत, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांच्या नेतृत्वात १८० साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजित केले आहेत. गोरे हे संपादक असलेल्या युगंधर प्रकाशन या संस्थेच्या वतीने आजवर १४४ दर्जेदार ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत.
शिवव्याख्यानासह विविध विषयावर त्यांनी २ हजाराहून अधिक व्याख्याने महाराष्ट्रात दिली आहेत. तसेच महाराष्ट्र गौरव सह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्याचसोबत त्यांच्या 'सूर्या एक प्रेरणादायी प्रवास' या मराठी चित्रपटाने कान्स बर्लिन सारख्या जगविख्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिकावर आपली विजयी मोहर उमटवली आहे. तर 'धर्माची दारू जातीची नशा' या नाटकाचे व महापुजेची उतर पुजा, अन्नदान की पिंडदान, बर्हिवासा पंखातलं आकाश आदी लघुचित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.
इतकी संमेलनं आयोजित करणारे ते साहित्य विश्वातील एकमेव व्यक्ती असून हजारो साहित्यिकांना त्यांनी आजवर विचारपीठ मिळवून दिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचा त्यांनी मराठी काव्य अनुवाद केला असून इतर ९ ग्रंथाचे विपुल लेखन केले आहेत. रणांगण एक संघर्ष ,उषःकाल, प्रेमरंग, एैतवी, सूर्या एक प्रेरणादायी प्रवास, फुल टू हंगामा आदी मराठी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे व गीतलेखन व संगीत देखील दिले आहेत.