जुही चावला (Juhi Chawla) त्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने त्या काळातील जवळपास सर्वच मोठ्या स्टार्ससोबत काम केल आहे. आणि नंतर बिझनेसमन जय मेहता (Jay mehta) सोबत लग्न केलं. त्यांना मुलगी जान्हवी मेहता (Janhavi mehta) आणि मुलगा अर्जुन मेहता (Arjun mehta) ही दोन मुले आहेत. त्याच्या मुलांना प्रसिद्धीच्या झोतात येणे आवडत नाही. तरी काहीवेळा त्यांची मुलगी दिसली आणि चाहत्यांना ती खूप आवडली आणि ती बऱ्याचदा चर्चेत देखील आली. ती दिसायला खूप सुंदर आहे आणि बऱ्याच अंशी ती तिच्या आईसारखी आहे. जान्हवी मेहताला तिच्या आईप्रमाणे अभिनयात करिअर करायचे नसले तरी तिला खेळाची प्रचंड आवड आहे. जान्हवी म्हणते की तिला लेखिका बनायचं आहे. एका मुलाखतीत जुही चावलाने सांगितले होते की जान्हवीला वाचनाची खूप आवड आहे. जान्हवीला वेगवेगळी पुस्तकं वाचण्यात जास्त आवडतात. जुहीने सांगितले पुढे असेही सांगितले होते की जान्हवीला जरी लेखिका व्हायचे होते तरी देखील एकेकाळी तिला मॉडेलिंगही करायची होती.
जुहीने एक पोस्ट करत लिहिले होते की ती लहान असल्यापासून क्रिकेट पाहण्याचा तिला छंद आहे. समालोचकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकल्यानंतर तिला खेळातील गुंतागुंत समजू लागली. ती साधारण १२ वर्षांची असताना आम्ही फिरायला गेलो होतो. हॉटेलमध्ये एक जाडसर कॉफी टेबल बुक होते. त्यात जगातील सर्व क्रिकेटपटूंच्या जीवनकथा, कर्तृत्व, रेकॉर्ड्स होते. हॉटेलमध्ये घालवलेले काही दिवस त्यांनी तलावाच्या कडेला बसून ते पुस्तक वाचले. हे इतके असामान्य होते की 12 वर्षांची मुलगी एवढं मोठं स्वप्न पाहत होती. त्याक्षणी हे सर्व पाहून मला देखील आश्चर्य वाटले होते. कालांतराने तिची खेळातील आवड ही वाढत गेली. काही काळापूर्वी जान्हवी मेहता आयपीएल लिलावात आर्यन खानसोबत दिसली असताना त्यानंतर तिची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर दोघांचे फोटो पाहून यूजर्सनी ज्युनियर जुही आणि ज्युनियर शाहरुख या दोघांनाही कॉल करायला सुरुवात केली होती. जुही चावला देखील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत जान्हवी जुहीऐवजी क्रिकेट संघाचे काम पाहत होती. जान्हवी सध्या परदेशात शिकत आहे.