Bollywood Team Lokshahi
मनोरंजन

Sunny Deol : सनीबद्दल गुपित उघड, अमृताने केला खुलासा

पूजासोबतच्या लग्नाच्या बातमीने अमृताचे मन तोडले होते.

Published by : prashantpawar1

'बेताब' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारा अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आपल्या अ‍ॅक्शन आणि उत्कृष्ट संवादासाठी ओळखला जातो. 'बेताब' या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेला सनी देओल ९० चे दशक येईपर्यंत मोठा स्टार बनलेला होता. आपल्या यशामुळे सनी देओल त्याच्या लव्ह लाईफमुळे अधिक प्रमाणात चर्चित होता.

बेताब चित्रपट रिलीज झाल्यानंतर सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण झाली. त्यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडच्या गल्लीबोळात रंगली होती. परंतु काही दिवसांनी अशी बातमी पसरली की अमृता सिंगशिवाय सनी देओल लंडनमधील पूजा नावाच्या मुलीला डेट करत होता. पूजासोबतच्या लग्नाच्या बातमीने अमृताचे मन तोडले होते.

सनी देओलच्या लग्नानंतर डिंपल कपाडियाने तिच्या आयुष्यात एंट्री घेतली. दोघांनी आग का गोला, अर्जुन, गुनाह, मंझिल-मंझिल आणि नरसिंहा यांसारखे उत्तम चित्रपट केले. त्या दोघांच्या जोडीला खूप पसंती दिली जात होती. यानंतर सनी देओलचे नाव राजेश खन्ना यांच्या पत्नी डिंपल कपाडियासोबत जोडले गेले. त्यांच्या अफेअरच्या बातम्या कॉमन होऊ लागल्या. यानंतर डिंपल पतीपासून वेगळे राहू लागली आणि दोघांनीही गुपचूप लग्न केल्याचे वृत्तात म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यावेळी डिंपलच्या मुली ट्विंकल खन्ना आणि रिंकल सनी देओलला छोटे पापा म्हणू लागल्या. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरचा खुलासा सनीची एक्स गर्लफ्रेंड अमृता सिंगने एका मुलाखतीत केला होता. यानंतर सनीची पत्नी पूजाने (पूजा) त्याला धमकी दिली त्यानंतर सनीने कुटुंबाची निवड केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला