मनोरंजन

Rinku Rajguru: रिंकूने घेतली स्वबळावर नवी कार, पाहा 'हे' फोटो...

रिंकू राजगुरू जिला आर्ची अशी ओळख मिळाली, अशी रिंकू 'सैराट' या चित्रपटामुळे रातोरात महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सैराट चित्रपटातून तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला

Published by : Team Lokshahi

रिंकू राजगुरू जिला आर्ची अशी ओळख मिळाली, अशी रिंकू 'सैराट' या चित्रपटामुळे रातोरात महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सैराट चित्रपटातून तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आणि आपली ओळख मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केली. सैराटसोबतचं ती इतर काही चित्रपटात देखील काम करून झाली आहे. कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा आणि नुकताच आलेला झिम्मा २ या चित्रपटातून रिंकू पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आली आणि आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले. तसेच रिंकू तिच्या साध्या-सरळ राहणीमानासाठी ही प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील तिच्या मनमोहक पोस्टने तिच्यावर चाहत्यांकडून नेहमीच कौतुकांचा वर्षाव होत असतो.

अशातच रिंकूने तिची पहिली कार खरेदी केली आहे. 'टाटा हॅरियर' लक्झरी ही कार तिने घेतली आहे. या कारसोबत तिने काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या आलिशान कारची किंमत 9 ते 10 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच या कारसोबत पोस्ट केलेल्या फोटोमध्ये रिंकूने पांढरा शर्ट आणि डोक्यावर टोपी असा डॅशिंग लूक केला आहे.

त्याचसोबत या पोस्टसाठी रिंकूने कॅप्शनमध्ये लिहलं आहे, "पहिली नेहमीच खास असते, तुम्ही तुमची स्वतःची पहिली कार खरेदी करता तेव्हा एक वेगळीच भावना असते. तर, हे माझे नवीन प्रेम!" रिंकूच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच अनेक कलाकार मंडळींकडून देखील कमेंट्सद्वारे रिंकूचं अभिनंदन केलं जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा