मनोरंजन

राइजिंग इंडी म्युझिकचे 'दुआँयें' गाणे रीलीज

राइजिंग इंडी म्युझिक लेबलने १८ जानेवारी २०२३ रोजी नवीन म्युझिक सिंगल 'दुआँयें' रीलीज केले ज्यामध्ये अभिनेत्री सृष्टी रोडे आणि अभिनेता विशाल आदित्य सिंग या जोडीला फिचर करण्यात आले आहे.

Published by : Sagar Pradhan

'दुआँयें' सॉंग लॉन्च यशस्वी ठरले त्यानिमित्ताने बऱ्याच प्रसिद्ध सेलिब्रिटींनी राइजिंग इंडी म्यूजिक लेबल चे अभिनंदन केले तसेच त्यांचे सहकारी कलाकार विशाल आदित्य सिंग आणि सृष्टी रोडे यांना पाठिंबा देऊन शुभेच्छा दिल्या. साहिल आनंद, विशाल सिंग, नीती टेलर, आकांक्षा सिंग, सायरा सट्टानी, सनी हिंदुस्तानी, अबीगेल पांडे, काव्या सिटोले, सुशांत पुजारी, आदित्य देशमुख आणि ब्राइटचे मिडीया चे मालक योगेश लखानी यांसारख्या सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

'दुआँयें' हे गाणे चंदीगडमधील सुंदर लोकेशन्सवर शूट करण्यात आले. या गाण्यात डॅशिंग अभिनेता विशाल आदित्य सिंग आणि स्टनिंग अभिनेत्री सृष्टी रोडे ला फिचर करण्यात आले आहे. हे गाणे प्रेमातील विरह आणि वेदना यांना दर्शविते. जे गाण्यातील मुख्य पात्र अनुभवताना दिसते. जेव्हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांपासून दुरावतात त्यानंतर होणाऱ्या दुःखा ची स्थिती हे गाणे दर्शविते. 'दुआँयें' या गाण्याचे निर्देशन व्हीके सिंग मॉम यांनी केले आहे तसेच हे हृदयस्पर्शी गाणे मोहम्मद दानिश यांनी गायले आहे, जे अमन आणि अयान यांनी कंपोज केले आहे तर ए एम तुराज यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

आशुतोष पटेरिया म्हणतात, “जेव्हा मी करण पटेल यांना भेटलो आणि त्यांनी मला त्यांच्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी दिली, त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. ज्येष्ठ गीतकार ए.एम. तुराझ जी या गाण्या निमित्ताने आमच्याशी जोडले गेले हे देखील आमचे भाग्य आहे. तुराझ जी यांनी इंडस्ट्रीतील अनेक उत्तम गाण्यांचे बोल लिहिले आहेत तसेच त्यांची गाणी संगीत उद्योगातील "लँडमार्क" आहेत हे सांगण्यास मी अजिबात संकोच करणार नाही. एम तुराझच्या लिरिक्स सह 'दुआँयें ' ही एक अनोखी धून आहे आणि मला खात्री आहे की सर्वांना हे गाणे आवडेल. हे गाणे एका मध्यमवर्गीय जोडप्याबद्दल आहे जे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती गमावता तेव्हा ते कधीही न भरून निघणारे मोठे भावनिक नुकसान असते. अशी या गाण्याची दुःखद प्रेमकथा आहे.

तसेच आमचे निर्माते करण पटेल यांनी 90 च्या दशकातील संगीत विलक्षण पद्धतीने प्रसारित करण्यास सुरुवात केली. ज्याला आम्ही आमच्या म्यूजिक लेबलसह परत आणून, रायझिंग इंडी म्युझिकमधे क्रांती घडवू इच्छितो.

निर्माता करण पटेल म्हणाले, "आम्ही एका शॉर्टफिल्मवर देखील काम करत आहोत, परंतु त्याबद्दल अद्याप काहीही निश्चित झालेले नाही; आमच्याकडे सध्या म्युझिक प्रोजेक्ट्स आहेत. आमच्या म्युझिक लेबलद्वारे भविष्यात तीनपेक्षा जास्त ट्रॅक रिलीज केले जातील. त्याखेरीज म्युझिक चा एक मजबूत ब्रँड स्थापित करण्यासाठी, नवोदित संगीतकारांचे पालनपोषण करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतेच्या आधारावर त्यांना भरभराटीची संधी प्रदान करण्यासाठी आम्ही रायझिंग इंडी म्युझिक लाँच केले.

अभिनेता विशाल आदित्य सिंग म्हणतो, "हे गाणे खूप छान आहे आणि तुराज सरांनी याचे बोल लिहिले आहेत जे खूप सुंदर आहेत," आपल्या सर्वांना माहित आहे की तुराज जी यांनी यापूर्वी अप्रतिम गाणी लिहिली आहेत. मला या गाण्याचा एक भाग बनण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे, हे गाणे मोहम्मद दानिश यांनी गायले आहे आणि ते खरोखरच मंत्रमुग्ध करणारे गाणे आहे. मी आणि सृष्टीनेही या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणे मनातील प्रेम, त्यातील वेदना दोन व्यक्तींचे एकत्र येणे आणि विरह याबद्दल आहे. मी सर्व संगीतप्रेमींना आमचे 'दुआँये' गाणे ऐकण्याची शिफारस करेन.

तर अभिनेत्री सृष्टी रोडे म्हणते,

आम्ही या नवीन गाण्याबद्दल खूपच उत्सुक आहोत, हे गाणे तुमच्या हृदयाला स्पर्श करेल कारण ही प्रेमाची उत्कट कथा आहे. जेव्हा मी त्याचे संगीत आणि बोल ऐकले, तेव्हा मी सुरुवातीलाच गाण्याच्या प्रेमात पडले आणि मी तेव्हाच ठरविले कि ही संधी माझ्या हातून जाता कामा नये. आम्ही हे गाणे चंदीगडमध्ये शूट केले आणि हा माझ्यासाठी एक मजेदार अनुभव होता.

हे गाणे खूप मेहनत आणि विचार करून बनवले गेले आहे, निर्मात्याने ते बनवताना खूप मेहनत घेतली आहे, दिग्दर्शक आणि संगीतकार यांनी देखील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे, दानिशचे मंत्रमुग्ध करणारे स्वर भावनांना अधिक महत्वपूर्ण बनवतात.

म्यूजिक सिंगल "दुआँयें" १८ जानेवारी, २०२३ ला बॉम्बे कॉकटेल बार, अंधेरी, मुंबई येथे रिलीज करण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gaza Situation : अन्न-पाण्यासाठी झुंजताना शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया