Team Lokshahi
मनोरंजन

रितेश देशमुख-जेनेलिया डिसूजा 10 वर्षांनंतर शेअर करणार स्क्रिन

खऱ्या आयुष्यातील हिट जोडी पडद्यावर पुन्हा जादू करू शकणार?

Published by : shweta walge

बी टाऊनचे सर्वात लोकप्रिय आणि आवडते जोडपे म्हणजे रितेश देशमुष आणि जेनेलिया डिसूझा. सोशल मीडियावर दोघांच्या फनी रील व्हिडिओंचा बोलबाला आहे. रियल लाईफ कपल रितेश आणि जेनेलिया आता १० वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी या जोडप्याचे चाहते उत्सुक आहेत.

जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. पण आता हे रिअल लाईफ कपल एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. रितेश आणि जेनेलिया 10 वर्षांनंतर मराठी चित्रपट 'वेड'मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातून जेनेलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

या चित्रपटातून रितेश आणि जेनेलियाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे, जो चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. जेनेलियाने मराठी डेब्यू चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना लिहिले - माझा जन्म महाराष्ट्रात झाला. मी जेव्हा अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा मी हिंदी, तमिळ, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये चित्रपट केले. तिथल्या प्रेक्षकांचं मला खूप प्रेम मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनातून मी मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे.

जेनेलिया आणि रितेश यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात एकत्र केली होती. दोघांनी 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच आवडली आहे. रिअल लाइफ जोडप्यांच्या सोशल मीडियावर रील व्हिडिओंना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळते. आता दोघेही मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 30 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत रितेश आणि जेनेलियाच्या लग्नातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री कितपत आवडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

MP Dhananjay Mahadik : खूशखबर!, खासदार धनंजय महाडिक मोठी घोषणा; सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याचं 'हे' खास गिफ्ट