मनोरंजन

IIFA मध्ये मराठीचा डंका; रितेश-जिनिलियाच्या वेड चित्रपटाला 'या' पुरस्काराने सन्मानित

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर संबंध जगाला आपलं वेड लावलं.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर संबंध जगाला आपलं वेड लावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीमुळेही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं 'वेड' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानं अनेक मराठी पुरस्कार मिळवले आहेत. पण, आता हिंदी पुरस्कारावर देखील या सिनेमानं नाव कोरलं आहे.

बॉलीवूडमध्ये मानाचा मानला जाणारा ‘आयफा’पुरस्कार सोहळा नुकताच अबू धाबी येथे पार पडला. यात रितेश जिनिलियाने खास हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात मराठीचा डंका वाजलेला आहे. रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ही बातमी त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. तर जिनिलिया ही या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर यांनी काम केलं आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती