Riya Chakravarthi Team Lokshahi
मनोरंजन

Riya Chakravarthi : पुरुषांबद्दल रियाने सांगितल्या काही सिक्रेट गोष्टी...

रिया म्हणाली की जे पुरुष आपल्या महिला जोडीदाराचे ऐकत नाहीत ते नेहमीच...

Published by : prashantpawar1

बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री रिया चक्रवर्ती(Riya Chakravarti) एका मुलाखतीत तणावमुक्त नातेसंबंधाबद्दल काही रहस्य सांगताना रियाने सांगितले की, पुरुषांनी नेहमी महिलांचे ऐकले पाहिजे. तसेच ती गमतीने म्हणाली की जे पुरुष आपल्या महिला जोडीदाराचे ऐकत नाहीत ते नेहमीच आपल्या आयुष्यात दुःखी असतात. रियाने 2018 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की "मला वाटते की पुरुषांनी फक्त महिलांचेच ऐकले पाहिजे. आम्ही काय करतो आहोत आम्ही काय बोलत आहोत हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला तणावमुक्त नातेसंबंध आणि चांगले जीवन हवे असेल तर स्त्रियांचे ऐका." महेश भट्ट(Mahesh Bhatt) यांनीही रियाच्या या मुद्द्याला होकार दिला आणि सांगितले की तो सुद्धा एक 'आनंदी माणूस' आहे. कारण तो अशा घरातून आहे जिथे महिलांचा आदर हा अधिक प्रमाणात केला जातो.

रिया पुढे म्हणाली की, जे पुरुष महिलांचे ऐकत नाहीत ते नेहमीच आपल्या वयक्तिक आयुष्यात दुःखी असतात. सोनी राजदानचे पती आणि पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांचे वडील महेश भट्ट म्हणाले की महिला बुद्धिमान असतात आणि योग्य निर्णय घेतात. 'जलेबी'नंतर रिया फक्त 'चेहरे' या मिस्ट्री थ्रिलरमध्ये दिसली.

2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांच्याशिवाय अमिताभ बच्चन(Amitabh Bachhan), इमरान हाश्मी(Imran Hasmi) आणि सिद्धांत कपूर(Siddhant Kapoor) देखील मुख्य भूमिकेत होते. रियाने 2013 मध्ये आलेल्या 'मेरे डॅड की मारुती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यापूर्वी रिया VJ (व्हिडिओ जॉकी) म्हणून काम करत होती. तिने एमटीव्हीचे अनेक कार्यक्रमही होस्ट केलेले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा