Neha Kakkar, Rohanpreet Singh Team Lokshahi
मनोरंजन

नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंगचा हॉटेलमधून चोरीला गेला सामान

रोहनप्रीत सिंगचा हॉटेलमधून चोरीला सामान गेले आहे.

Published by : shamal ghanekar

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नेहा तिच्यापेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्न केल होते तेव्हाही नेहा चर्चेत आली होती. नेहा पती-पंजाबी गायक आहे. त्याचे नाव रोहनप्रीत (Rohanpreet Singh) आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. हे जोडप सोशल मिडियावर सक्रिय असते. तो हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री राहिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा त्याला टेबलवर ठेवलेले त्याचे सर्व सामान दिसले नाही. तेव्हा त्याचे हॉटेलमधून त्याचे सामान चोरीला गेले आहे. त्याच्या सामानामध्ये मौल्यवान गोष्टी होत्या. सुत्राकडून मिळालेल्या माहितीवरून, चोरीला गेलेल्या सामानामध्ये अॅपल वॉच, आयफोन आणि डायमंड रिंग या गोष्टींचा समावेश आहे. ही संपूर्ण घटना हिमाचलमधील एका हॉटेलमध्ये घडली आहे.

रोहनप्रीतचं हॉटेलमधून सामान चोरीला गेल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोचले. आणि पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यायला सुरूवात केला आहे. त्याने इतर जागी शोधले, मात्र सामान कुठेही सापडले नाही. हरवलेल्या गोष्टीमध्ये महागड्या वस्तूं होत्या. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात घेत आहेत. हॉटेलमधील रोहनप्रीतच्या खोलीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा होता. लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.

या प्रकरणाचा तपास हिमाचलमधील मंडीच्या (Mandi) एसीपी शालिनी अग्निहोत्री घेत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार हॉटेलमधील सर्व स्टाफची चौकशी सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा