Pratik & Rohit Team Lokshahi
मनोरंजन

Rohit Shetty : प्रतिकला फटकारताना रोहितचा राग अनावर...

रोहित शेट्टीच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आहे.

Published by : prashantpawar1

रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांचा शो 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) सीझन 12 मागील काही दिवसांपासून सतत चर्चित आहे. शोचे शूटिंग केपटाऊनमध्ये सुरू आहे जे शेवटच्या टप्प्यावर आहे. 'खतरों के खिलाडी सीझन'च्या सेटवरून एक नवीन फोटो समोर आला आहे. दरम्यान खतरों के खिलाडीच्या सेटवरून एक नवीन बातमी देखील समोर आली आहे. बिग बॉस फेम प्रतीक सहजपाल (Pratik Sahajpal) हा सतत खेळाचे नियम तोडताना दिसला आणि त्यामुळे त्याला रोहित शेट्टीच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आहे.

खरं तर टास्क दरम्यान फैजू आणि तुषार कालिया विरुद्ध प्रतीक आणि चेतना टास्क खेळत होते. प्रतिक टास्क पूर्ण करू शकला नाही तर रोहित त्याला पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करताना दिसला. एवढच नव्हे तर प्रतिकने नकार देऊनही तो तारेचा वापर करून पुन्हा पुन्हा काम करत राहिला. यादरम्यान रोहितने प्रतीकला तार सोडून जा असं अनेक वेळा सांगितलं. कारण तो सुरक्षित नाही आणि खेळाच्या नियमांच्याही विरुद्ध आहे. रोहितने असं बोलल्यानंतर देखील प्रतीकने तार पकडली. मग काय रोहित शेट्टी यांचा राग अनावर झाला आणि त्याने प्रतीकला फटकारले. इतकच नव्हे तर रोहित शेट्टीने प्रतीक सहजपाल यांनाही धमकी दिली की जर तो मान्य नसेल तर हे टास्क रद्द करू.

शोमध्ये पहिल्यांदाच रोहित शेट्टी इतका रागाच्या भरात दिसला आहे. प्रथम प्रतीक रोहितच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता परंतु त्याला राग येताच प्रतीक आपोआप लाईनवर आला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा