मनोरंजन

RRR | प्रदर्शनाआधीच ‘RRR’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

Published by : Lokshahi News

दक्षिण इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या आपल्या आगामी 'आरआरआर' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण याच्या वाढदिवसांच्या निम्मिताने त्याने या चित्रपटातील त्याचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये अजय देवगण दमदार स्टाईलमध्ये दिसला आहे. अशा परिस्थितीत आता एसएस राजामौली यांनी 'आरआरआर'चे नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स पेन स्टुडिओला विकल्याचे समोर आले आहे. जयंतीलाल गडा यांनी 1900च्या दशकावर आधारित या चित्रपटाचे सर्व भाषांमधील इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सॅटेलाईट अधिकार खरेदी केले आहेत.

या चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रॉडक्शन हाऊसद्वारेच प्रदर्शित केली जाईल. 'बाहुबली' नंतर एस.एस. राजामौलीचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचे आतापर्यंतचे डील पाहता या हक्कांची किंमत 200 कोटी रुपये ठेवली गेली होती, परंतु नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स 140 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. राजामौलींचा 'आरआरआर' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जाते आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा