थोडक्यात
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा
मुलगी ईशा देओलने पोस्ट करत दिली महत्त्वाची माहिती
(Dharmendra ) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. याच पार्श्वभूमीवर मुलगी ईशा देओलने स्पष्टीकरण दिलं आहे. "माझे वडील स्थिर आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारतेय. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतोय. माझ्या वडिलांसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद" अशी इशा देओलने पोस्ट करत माहिती दिली आहे.