Bharati Singh & Harsh Limbachiyaa Team Lokshahi
मनोरंजन

हास्यसम्राज्ञी भारती बनली आई?

Rumours of Comedian Bharati gave birth to baby girl | ती आई झाली असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे

Published by : Vikrant Shinde

कॉमेडियन भारती सिंग (Comedian Bharati Singh) प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. ती आई झाली असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. भारतीने गोंडस मुलीला (Baby Girl) जन्म दिला असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीने आई झाली नसल्याचा खुलासा केला असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला चाहत्यांना दिला आहे. तिने बाळाला जन्म दिला नसून तारीख जवळ आली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भीती वाटत असते, असं भारती म्हणाली.

आपलं बाळ कसं असेल, असे हर्ष (Harsh Limbachiya) नेहमी विचारतो. बाळ कसं असेल सांगता येत नाही. परंतु विनोदी नक्कीच असणार याची खात्री आहे, असंही भारतीने सांगितले.

सध्या सोशल मीडियावर हर्ष सोबतचे भारतीचे फोटो व्हायरल होत असून त्यांना चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता चाहत्यांना आणि कुटुंबियांना खुशखबर कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा