मनोरंजन

Saba Azad: सबा आझाद प्रेग्नेंट...? काय आहे बातमी मागचं सत्य जाणून घ्या

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा आझाद रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. आजवर अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक आणि सबाची जोडी आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टवरुन ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सबाच्या या पोस्टमध्ये तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यापोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'तुमचा स्त्रीरोगतज्ज्ञ कोण आहे?' हा फोटो शेअर करत सबाने लिहिलं आहे की, 'सध्या फक्त हाच प्रश्न माझ्या मनात घुमत आहे.' ही पोस्ट पाहून सबाचे चाहते आश्चर्यचकित झाले असून त्यांनी अभिनेत्रीला विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. लोक पोस्टवर भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'आधी लग्न कर आणि मग स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जा.' तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, 'काही गुडन्यूज आहे का?'

सबा आझादची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ज्युनिअर हृतिक येणारे का? आधी लग्न करा मग प्रसुतीरोगतज्ज्ञाचा शोध घ्या, अशा पद्धतीच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सबा आझादची ही पोस्ट सुजैन खान आणि हृतिक रोशनला चाहते टॅग करत आहेत.

परंतू खरे कारण असे आहे की सबा आझाद अ‍ॅमेझॉन मिनी टिव्हीवर 'WHO'S YOUR GYNAC' अशा एका सिरीजमध्ये काम करत आहे, तर सिरीजच्या प्रमोशनासाठी तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. पण ही पोस्ट पाहून नेटकरी सबा आझाद प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा