मनोरंजन

Sachin sanghvi : संगीतकार सचिन सांघवी अटकेत; तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

प्रसिद्ध संगीतकार सचिन सांघवी, ज्यांनी स्त्री 2, भेड़िया आणि मुंज्यासारख्या हिट भय-हास्यपटांसाठी संगीत दिलं आहे, ते एका गंभीर प्रकरणात अडकले आहेत.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • संगीतकार सचिन संघवी यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक

  • २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप ...

  • संगीतकार सचिन संघवीवर लैंगिक छळाचा आरोप

प्रसिद्ध संगीतकार सचिन सांघवी, ज्यांनी स्त्री 2, भेड़िया आणि मुंज्यासारख्या हिट भय-हास्यपटांसाठी संगीत दिलं आहे, ते एका गंभीर प्रकरणात अडकले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना एका तरुणीच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन यांनी त्या महिलेचं करिअर घडवण्याचं आणि लग्न करण्याचं आश्वासन देऊन तिचा गैरफायदा घेतला.

ही तक्रार 20 वर्षांच्या एका तरुणीने नोंदवली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ती फेब्रुवारी 2024 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून सचिनच्या संपर्कात आली होती. संगीत क्षेत्रात संधी मिळावी, या हेतूने सुरू झालेली त्यांची ओळख काही महिन्यांतच वैयक्तिक नात्यात बदलली. महिलेच्या आरोपानुसार, सचिन यांनी तिला म्युझिक अल्बम देण्याचं वचन देत स्टुडिओमध्ये बोलावलं आणि तेथेच विवाहाचं आश्वासन देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

महिलेने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, हे सर्व कृतीपूर्वक आणि जाणूनबुजून घडवले गेले. पोलिसांनी तक्रारीवर तात्काळ कारवाई करत सचिन सांघवी यांना बीएनएसच्या संबंधित कलमांखाली अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू असून, पोलिसांनी या प्रकरणात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

सचिन सांघवी हे सचिन-जिगर या प्रसिद्ध जोडीचा भाग आहेत, ज्यांनी बॉलिवूडला “परम सुंदरी”, “नादानियां”, “तेरी बातों में ऐसा उलझा जिया”, “भेड़िया”, “स्त्री”, “हिंदी मीडियम” यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण संगीतसृष्टीत खळबळ उडाली आहे आणि चाहत्यांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा