मनोरंजन

सलमान खान आणि कटरीनाचा “टायगर 3” हा चित्रपट लवकरच रिलीज

Published by : Team Lokshahi

शाहरुख खानची 'पठाण' (Pathan) चित्रपटच्या रिलीज डेट जाहीर झाल्यापासून चाहते सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) च्या रिलीज डेटची वाट बघत आहेत. यशराज फिल्म्सने (Yashraj Films) गुरुवारी व्हिडिओ रिलीज करून सलमान खान आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. अधिकृत माहितीनुसार 'टायगर 3' पुढच्या वर्षी 21 एप्रिल 2023 ईदला (Eid) रिलीज होणार आहे.

सलमान खानने शुक्रवारी आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर 'टायगर 3' चा पहीला टीजर रिलीज केला आहे. टीझरमध्ये कतरिना कैफ अॅक्शन (Action) करताना दिसत आहे. शेवटी कतरिना कैफ सलमान खानला विचारते, 'तू तयार आहेस का' तेव्हा भाईजान म्हणतो , 'टायगर सदैव तयार असतो'. टीझर (Teaser) शेअर करत सलमान खान लिहितो, "सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. टायगर-3 हा 21 एप्रिल 2023 म्हणजेच ईदला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ' हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे . अशी माहिती सलमाननं या पोस्टमधून दिली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन (Directing) मनीष शर्मा (Manish Sharma) करणार आहेत. टायगर 3 सलमान खान आणि कतरिना कैफचा अॅक्शन चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात सलमान खान भारतीय गुप्तहेर अविनाश सिंग 'टाइगर' राठोर ची भूमिका साकारत आहे. ज्याला झोया हुमैमी (कतरिना) या पाकिस्तानी गुप्तहेर च्या प्रेमात पडतो. तिसर्‍या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच दिल्लीत (Delhi) आणि त्याच्या आसपास पूर्ण झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा