Salman Khan Team Lokshahi
मनोरंजन

सलमान खानने अनोख्या अंदाजात केली 'बिल्ली बिल्ली' गाण्याची घोषणा

'किसी का भाई किसी की जान' मधील 'बिल्ली बिल्ली' या गाण्याच्या ऑडिओला दर्शकांची पसंती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने, आपल्या आउट-ऑफ-द-बॉक्स स्टाईलमध्ये सोशल मीडियावर 'किसी का भाई किसी की जान'मधील 'बिल्ली बिल्ली' हे नवीन गाणे रिलीज करण्याची घोषणा केली आहे. दर्शकांची उत्सुकता वाढवून, सलमानने या गाण्याच्या व्हिडिओमध्ये व्हिज्युअलऐवजी काही मांजरींसह फक्त गाण्याचा ऑडिओ प्रेक्षकांसमोर आणला आहे.

आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' मधील 'बिल्ली बिल्ली' या गाण्याच्या ऑडिओला दर्शकांची पसंती मिळत असून, निर्मात्यांनी हा ऑडिओ सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज केला आहे. अशातच, सिनेप्रेमी गाण्याच्या व्हिडिओ रिलीजची प्रतीक्षा करत असून, आपली उत्सुकता दर्शवत आहेत.

'बिल्ली बिल्ली' एक जबरदस्त पंजाबी डांस नंबर असून, यामध्ये मेगास्टार आणि सुखबीर पहिल्यांदाच गाण्यासाठी सहयोग करत आहेत. सुखबीर हे चार्टबस्टर गाण्यांसाठी ओळखले जातात. या गाण्याचे संगीत सुखबीर यांनी दिले असून कुमार यांनी लिरिक्स लिहिले आहे. तसेच, सुरुवातीच्या ट्रेंडनुसार 'बिल्ली बिल्ली' चार्टबस्टर बनण्याच्या मार्गावर आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का