Salman Khan Team Lokshahi
मनोरंजन

Salman Khan : सलमानच्या बॉडीगार्डचा पगार माहितीये का ?

सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी त्याचा अंगरक्षक शेरा यांच्यावर आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार गँगस्टर लॉरेन्स विश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. तुम्हाला काहीवेळा प्रश्न नक्कीच पडला असेल की सलमान खानची सुरक्षा नेमकी कोणाच्या हातात आहे. आणि त्यासाठी त्याला किती पैसे दिले जातात. सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी त्याचा अंगरक्षक शेरा यांच्यावर आहे. जो सलमानसोबत नेहमी सावलीसारखा असतो. एकदा एका मुलाखतीत शेराने असेही म्हटले होते की तो सलमान खानच्या पुढे किंवा मागे चालत नाही तर पुढे जातो जेणेकरून तो त्याच्यावर येणारा धोका सहन करू शकेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार शेरा हा सलमान खानला मालक म्हणतो. शेरा एकदा एका मुलाखतीत बोलला होता की 'मालिक बोलेतो मेरे गुरु' सलमान भाईजान माझ्यासाठी सर्वस्व आहे कारण मी त्याच्यासाठी माझा जीव देखील देऊ शकतो.

तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सलमान खानची सुरक्षा सांभाळणाऱ्या शेराला त्याच्या कामाच्या बदल्यात किती पगार असेल ? मीडिया रिपोर्ट्सनुसार शेराला वर्षाला 2 कोटी रुपये मिळतात अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर शेरा मुंबईत स्वतःची सुरक्षा एजन्सीही चालवतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा