Salman Khan Fan Team Lokshahi
मनोरंजन

Salman Khan Fan: असा वेडेपणा कुठेच दिसला नाही..., सलमानला भेटण्यासाठी 1100 किलोमीटर सायकल चालवत चाहत्याने गाठली मुंबई

बॉलिवूड स्टार सलमान खानचे अनेक चाहते आहेत. अश्याच चाहत्यामधील एका चाहत्याने सलमान खानला भेटण्यासाठी हद्दच पार केली आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूड स्टार सलमान खानचे अनेक चाहते आहेत. अश्याच चाहत्यामधील एका चाहत्याने सलमान खानला भेटण्यासाठी हद्दच पार केली आहे. त्या चाहत्याने जबलपूर मध्य प्रदेशातून सायकल चालवत हजारो किलोमीटर दूर आपला आवडता स्टार सलमान खानला भेटायला आला.आणि आता सलमान भाईजानसोबतच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलीवूड स्टार्सबद्दल चाहत्यांची खूप क्रेझ आहे. आपल्या आवडत्या स्टारसाठी ते काहीही करायला तयार असतात. असाच एक मध्य प्रदेशातील जबलपूर येथे राहणाऱ्या सलमान खानच्या या चाहत्यानेही असेच काहीसे केले आहे. सलमानला भेटण्यासाठी या चाहत्याने सायकलवरून 1100 किलोमीटरचा प्रवास केला. हा चाहता भाग्यवान होता की जेव्हा तो सलमान खानच्या घराबाहेर पोहोचला तेव्हा अभिनेता त्याच्या घरी उपस्थित होता. या चाहत्याला अखेर सलमानला भेटण्याची आणि त्याच्याशी संवाद साधण्याची एक चांगली संधी मिळाली.

या चाहत्याचा सलमान खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सलमान चाहत्याची सायकल पकडलेला दिसत आहे, ज्यावर बिइंग ह्युमन लिहिलेले आहे. या सायकलच्या हँडलसमोर लिहिलं आहे- चला आशीर्वाद देत जाऊ, जबलपूर से मुंबई दिवाना में चला. या फोटोवर कॅप्शन लिहिले आहे - जबलपूरचा रहिवासी असलेला समीर मेगास्टार सलमान खानला भेटण्यासाठी 1100 किलोमीटर सायकलिंग करून मुंबईत पोहोचला आहे. या पोस्टवर सलमानचे बाकीचे चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा