Salman Khan Team Lokshahi
मनोरंजन

Salman Khanला सतवत आहे त्याच्या जीवाची चिंता, धमकी मिळाल्यानंतर उचलले हे पाऊल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने आपली कार बुलेटप्रूफमध्ये अपग्रेड केली आहे.

Published by : Team Lokshahi

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) गेल्या महिन्यात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तेव्हापासून त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर सलमान खान देखील प्रत्येक बाबतीत सावध दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:साठी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने आपली कार बुलेटप्रूफमध्ये अपग्रेड केली आहे.

सलमान खानने बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता

सलमान खानने गेल्या आठवड्यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची दक्षिण मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. सलमान खानने पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांचीही भेट घेतली. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान खान मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले होते की, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सलमान खानने नुकतेच मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे.

विशेष म्हणजे 5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथील सलीम खान (Salim Khan) यांच्या गार्डला धमकीचे पत्र मिळाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रात त्यांना सिद्धू मूसवालासारखे बनवले जाईल, असे लिहिले होते. धमकीचे पत्र मिळाल्याच्या काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा