Salman Khan and Aayush Sharma Team Lokshahi
मनोरंजन

सलमानच्या चित्रपटामधून मेहुणा आयुष आऊट ; 'हे' आहे कारण

या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी हे करत आहेत

Published by : shamal ghanekar

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर काही लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलिवूडमधील भाईजान म्हणजेचं अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांचा 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानचा मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) मुख्य भुमिका साकारणार होता. पण सुत्राकडून मिळालेल्या माहितीवरून आयुष शर्मा या चित्रपटामध्ये काम करणार नाही आहे.

या अगोदर सलमान आणि आयुष हे अंतिम द फाइनल ट्रुथ (Antim: The Final Truth) या चित्रपटामध्ये एकत्र काम करताना पाहिले होते. परंतु एसकेएफ आणि आयुष यांच्यामध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे सलमानचा मेहुणा आयुष शर्मा या चित्रपटामधून बाहेर पडला आहे. आयुषबरोबर जहीर इकबालही या चित्रपटामध्ये दिसणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी (Farhad Samji) हे करत आहेत. 'कभी ईद कभी दिवाळी' (Kabhi Eid Kabhi Diwali) हा चित्रपट 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सलमानबरोबर पूजा हेगडे (Pooja Hegde) आणि वेंकटेश दग्गुबाती प्रमुख भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे शुटींग मुंबईमध्ये सुरू आहे. या चित्रपटाचा सेट हा विले पार्लेला बांधण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...