मनोरंजन

KKBKKJ : 'मैं हूं हीरो तेरा' नंतर सलमान खानच्या आवाजातील नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला

सलमान खान आता आपला आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मधील नव्या गाण्यासह पुन्हा आपल्या आवाजाने जादू निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

'मैं हूं हीरो तेरा'मधील आपल्या शानदार आवाजाने चाहत्यांना वेड लावल्यानंतर सलमान खान आता आपला आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मधील नव्या गाण्यासह पुन्हा आपल्या आवाजाने जादू निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 8 वर्षांपूर्वी जेव्हा सलमानने 'हिरो'साठी गाणे गायले होते, तेव्हा अमाल मलिकने संगीतबद्ध केलेले हे गाणे रिलीज होताच ब्लॉकबस्टर ठरले होते. अशातच, आता 2023 मध्ये सलमान खान आणि अमाल मलिक 'किसी का भाई किसी की जान'मधील 'जी रहे थे हम' (फॉलिंग इन लव्ह) या रोमँटिक गण्यासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.

निर्मात्यांनी आज 'जी रहे थे हम' (फॉलिंग इन लव्ह)चा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या गाण्याचे व्हिज्युअल आणि ट्यून पाहून 'किसी का भाई किसी की जान'च्या संपूर्ण अल्बममधील हे गाणे सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक असल्याचे दिसते. यामध्ये, सलमान आणि पूजा हेगडेची उत्तम ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही पाहायला मिळेल. तसेच, याशिवाय राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांना देखील स्क्रीनवर पाहायला मिळेल. या गाण्यात सलमान खानच्या स्वॅगसह त्याचे डान्स मूव्ह्सही अप्रतिम आहेत.

गाण्याच्या या टीझरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून, सिनेप्रेमी या गाण्याच्या संपूर्ण व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच, 'जी रहे थे हम' (फॉलिंग इन लव्ह) हे गाणे मंगळवार 21 मार्च रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 'जी रहे थे हम' (फॉलिंग इन लव्ह) हे गाणे 'नयो लगदा' आणि 'बिल्ली बिल्ली' नंतर 'किसी का भाई किसी की जान' अल्बममधील तिसरे गाणे आहे. तसेच, हे गाणे शब्बीर अहमद यांनी लिहिले असून सलमान खानने गायले आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?