मनोरंजन

सलमान खान भेटला सिल्वर मेडलिस्ट मीराबाई चानूला!

Published by : Lokshahi News

टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये इतिहास रचणारी खेळाडू मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.मीराबाई ही सलमान खानची मोठी फॅन आहे. अनेकदा तिने दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. हे सलमान खानला जेव्हा हे कळलं त्यानंतर त्याने मीराबाई चानूची भेट घेतली. अभिनेता सलमान खानने या भेटीचा एक फोटो देखील शेअर केलाय.

सलमानने या भेटीचा फोटो शेअर करत एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, "रौप्यपदक मिळवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन…मीराबाई चानूसोबतची प्रेमळ भेट…खूप खूप शभेच्छा तुला." या अगोदर तिच्या विजयानंतर ट्विटरवर तिचं अभिनंदन करताना सलमानने लिहिलं होतं की, "आज देशाची सुपरस्टार बनल्याबद्दल मीराबाई चानूचं खूप खूप अभिनंदन…आपण आम्हाला अभिमानास्पद केले आहे. आपण तर खऱ्या दबंग आहात."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?