Salman Khan
Salman Khan  Team Lokshahi
मनोरंजन

Salman Khan : भेटवस्तू घेऊन आलेल्या चाहत्यासोबत सलमानने केले असे काही की...; सोशल मीडियावर टीका

Published by : shamal ghanekar

भाईजान म्हणजेचं बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. सलमानचा चाहतावर्ग देशातचं नाही तर जगभरामध्येही आहेत. बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक कलाकारांना भेटण्यासाठी चाहते येत असतात आणि त्यांच्यासाठी भेटवस्तू आणत असतात. चाहत्यांकडून एवढे प्रेम मिळत असताना तो कधी-कधी आपल्या चाहत्यांशी गैरवर्तन करताना दिसतो. असाच एक व्हिडिओ आता समोर येत आहे.

नुकताच सलमानचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई विमानतळावर सलमान खान गाडीतून खाली उतरल्यावर त्याच्या चाहत्यांनी त्याचे फोटो काढू लागले. सलमान जेव्हा गाडीतून उतरल्यावर एका चाहत्यांनी भेटवस्तू म्हणून एक फोटो फ्रेम घेऊन आला होता. तेव्हा त्या व्यक्तीला पाहून सलमानच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि कसाबसा त्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढला. चाहत्याला पाहून त्याने विचित्र चेहरा केला आणि सलमानच्या चेहऱ्यावर साधे हसूही नव्हते. सलमान खानचं हे वागणं त्याच्या चाहत्यावर्गाला आवडले नाही. त्यामुळे सलमान खानला सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल केले जात आहे. तसेच सलमान विरोधात अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

सलमानच्या अशा वागण्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एका चाहत्यांनी म्हटलं की, 'पूर्वी तो मला आवडायचा; पण आता ते शक्य नाही. सलमानच्या या अ‍ॅटिट्युडवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सोबत पुन्हा एकदा 'टायगर 3' चित्रपटात दिसणार आहे. सलमानने नुकताच 'कभी ईद कभी दीवाली'च्या सेटवरील त्याचा फोटो शेअर करत त्याचा चित्रपटामधील लूक शेअर केला आहे.

Dilip Walse Patil : नागरिकांनी सजग राहून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे

Satyajeet Tambe : देशाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे, देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे

Nilesh Lanke : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

रायगडच्या खरिवलीतील आदिवासी महिलांचा मतदानावर बहिष्कार