मनोरंजन

सलमान खान, पुजा हेगडे आणि राम चरण एकत्र; चाहते झाले खूश, म्हणाले...

'किसी का भाई किसी की जान'मधील 'येंतम्मा' हे नवे गाणे झाले प्रदर्शित

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. तत्पूर्वी या सिनेमातील गाणी रिलीज झाली असून यांना सिनेप्रेमींचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. रोमँटिक ट्रॅक 'नैय्यो लगदा', पंजाबी डान्स नंबर 'बिल्ली बिल्ली', 'फॉलिंग इन लव्ह' आणि 'बठुकम्मा' या गाण्यांनंतर हिंदी-तेलुगू फ्यूजन असलेले 'येंतम्मा'हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

'येंतम्मा' हे गाणे हिंदी आणि तेलुगू प्रेक्षकांसाठी नक्कीच एक ट्रीट आहे. तसेच, या गाण्यात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबाती, आणि पूजा हेगडेसह राम चरणला देखील एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळणार आहे. या गाण्यात सलमान खान अनेक रूप आणि रंगांमध्ये दिसत आहे. अशातच, मनोरंजनाने भरपूर असलेल्या 'येंतम्मा'या गाण्याला वर्षातील सर्वात कूल स्वॅग सॉंग म्हणू शकतो यात शंका नाही.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?