Salman Khan Team Lokshahi
मनोरंजन

Salman Khan : सलमानला मारण्यासाठी घरापर्यंत पोहचला होता मारेकरी

सलमान खानच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणाचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

Published by : shweta walge

सलमान खानच्या (Salman Khan) हत्येचा कट रचल्या प्रकरणाचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत. वास्तविक,सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) जीवे मारण्याची धमकी दिली होती, शिवाय त्याच्या सलमानच्या हत्येसाठी मारेकऱ्याला मुंबईत (Mumbai) पाठवले होते.पण तो हल्ला करू शकला नाही. संपत नेहरा (Sampat Nehra) असे त्या मारेकऱ्याचे नाव असून तो लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात असल्याचे सांगितले जाते. हे खुलासे लॉरेन्स बिश्नोईचा खास सिद्धेश हिरामण कांबळे (Siddhesh Hiraman Kamble) उर्फ महाकाल याने केले आहेत.

सलमान खानला मारण्याची योजना

2021 मध्ये लॉरेन्सने कबूल केले की, त्याने सलमानच्या हत्येची जबाबदारी राजस्थानचा (Rajasthan) गँगस्टर संपत नेहराला दिली होती. योजनेनुसार संपत नेहरा मुंबईला पोहोचला. काही दिवस संपतने सलमान खानच्या मुंबईतील घरावर लक्ष ठेवले आणि नंतर संधी मिळाल्यावर सलमान खानवर गोळी झाडण्याचा प्लॅन केला.पण संपतकडे पिस्तूल होती आणि त्यामुळे त्याला दूरवरून नेम धरता येत नव्हता. मग त्यांने त्यांच्या गावातील एका दिनेश फौजीशी (army) संपर्क साधून आरके स्प्रिंग रायफल (RK spring rifle) मिळवली. पण रायफल संपतपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्याचा शोध काढला आणि त्याला अटक केली.

कोण आहे संपत नेहरा?

संपत नेहरा हा लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात आहे. चार वर्षांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स टोळीचा गुंड संपत नेहरा हा चंदिगड पोलिसातील निवृत्त सहायक उपनिरीक्षक रामचंदर यांचा मुलगा आहे. एवढेच नाही तर संपत हा राष्ट्रीय स्तरावरील डेकॅथलॉन (Decathlon) (हर्डल रेस) रौप्य पदक विजेता देखील आहे.

संपत नेहरा कसा झाला गुंड ?

अभ्यासादरम्यान संपत नेहरा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात आला. बिश्नोईने संपत नेहराचे इतके ब्रेनवॉश (Brainwash) केले की त्याला गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारण्यास भाग पाडले. आणि हळूहळू तो गुंड लॉरेन्सचा उजवा हात बनला. संपत हा लॉरेन्स गँगचा शार्प शूटर (Sharp shooter) देखील आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट