SALMAN KHAN RELEASES POWERFUL BATTLE OF GALWAN TEASER TRIBUTING INDIAN ARMY 
मनोरंजन

Salman Khan Birthday Special: सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपट; हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज

Battle Of Galwan: सलमान खानने आपल्या वाढदिवसानिमित्त ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा दमदार टीझर सादर केला आहे. मात्र हा केवळ वाढदिवशी दिलेला सरप्राइझ नसून, देशाच्या सीमांवर उभ्या राहून प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना अर्पण केलेला एक गंभीर आणि हृदयस्पर्शी अभिवादन आहे.

या चित्रपटात सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, त्याचा हा अवतार आजवरच्या सर्वात प्रभावी आणि दमदार भूमिकांपैकी एक मानला जात आहे. त्याचा कणखर पण संयमी स्वभाव, नियंत्रित आक्रमकता आणि शांततेतून व्यक्त होणारी ताकद हे सर्व त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देते. विशेषतः टीझरच्या शेवटच्या क्षणी त्याची निर्धारपूर्ण नजर प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवते.

टीझरमध्ये हिमालयातील कठोर आणि निर्दयी भूभाग, तसेच उंच पर्वतीय सीमांवरील युद्धाची कठोर वास्तविकता अत्यंत प्रभावी पद्धतीने दाखवली आहे. टीझरला स्टेबिन बेन यांच्या भावस्पर्शी आवाजाची साथ लाभते, ज्यामुळे दृश्यांमधील भावनिक तीव्रता अधिकच वाढते. त्यासोबत हिमेश रेशमिया यांनी दिलेला दमदार पार्श्वसंगीताचा ठेका, या दृश्यांना आणखी प्रभावी आणि हृदयाला भिडणारा बनवतो.

‘बॅटल ऑफ गलवान’ हा फक्त युद्धपट नाही तो संघर्षाची खरी किंमत, सीमांवर लढणाऱ्या सैनिकांचे अदम्य साहस आणि हे शाश्वत सत्य दाखवतो की, शौर्य जरी अमर असले तरी खरा विजय नेहमी शांततेचाच असतो. अपुर्व लखिया दिग्दर्शित हा चित्रपट शौर्य, त्याग आणि जिद्दीचे थरारक आणि निःसंग चित्रण करतो. या चित्रपटात चित्रांगदा सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट सलमा खान यांच्या ‘सलमान खान फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मित होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा