मनोरंजन

Salman Khan | एअरपोर्टवर झाली सलमान खानची अडवणूक

Published by : Lokshahi News

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांची गणना करणं फारच कठीण ठरेल. बॉलिवूडच्या भाईजानची मोठी फॅनफॉलोइंग आहे. मग ती भारतातच नाही भारताबाहेरही. प्रत्येक ठिकाणी सलमानच्या मागे पुढे अनेक कॅमेरे फिरत असतात. पण मुंबई विमानतळावर त्याला जवानांनी अडवले. असा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पसरत आहे .

त्याचा झाल असं की सलमान मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) गुरूवारी रात्री उशीरा पोहोचला होता. त्याच्या आगामी चित्रपटाचं शुटींग हे निरनिराळ्या देशांतील निरनिराळ्या लोकेशन्सवर होणार आहे. तेव्हा अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान पहिल्यांदा रशिया आणि त्यानंतर ऑस्ट्रिया तर नंतर अन्य लोकेशन्स असा प्रवास करणार आहेत. तेव्हा नेहमीप्रमाणे अनेक फोटोग्राफर्स त्याच्यामागे धावताना दिसत आहेत. मात्र पुढे आत जाण्यासाठी मात्र सुरक्षा दलाचे जवान त्याला अडवतात.

त्यांच्या एका खुनेवर सलमान थांबतो. सलमानला थांबल्यानंतर फोटोग्राफर्सनाही मागे जाण्यासाठी सांगण्यात येतं. व सगळे फोटोग्राफर्स मागे जातात. त्यानंतर अनेकानीं या व्हिडीओवर वर्दीची ताकद अश्या कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी या जवानांचं कौतुकही केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा