मनोरंजन

सलमान खानचा ‘अंतिम’ येणार ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चित्रपटाची चाहते नेहमीच वाट पाहत असतात. सलमान वर्षभरात अनेक चित्रपट करत नसला तरी दरवर्षी एखाद्या ठराविक सणाच्या दिवशी त्याचा चित्रपट नक्कीच प्रदर्शित होतो. या वर्षिदेखील सलमानचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'राधे' हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर आता सलमान खानचा आगामी चित्रपट 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात असून सलमानने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सलमानने नुकतंच इन्स्टाग्रामवर 'अंतिम' चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. यात सलमानचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सलमानने हे मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

"झी आणि पुनित गोएंका यांच्यासोबतचे आमचे नाते अद्भुत आहे. आम्ही 'रेस 3', 'लवयात्री', 'भारत', 'दबंग 3', 'कागज' आणि 'राधे' असे अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. यानंतर आता आम्ही 'अंतिम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील चित्रपटगृहात 'अंतिम' प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल, अशी मला आशा आहे," असे कॅप्शन सलमानने या मोशन पोस्टरला दिले आहे.

सलमान खानच्या 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळणार तसेच 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' हा चित्रपट मराठी हिट चित्रपट 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख