Salman Khan Aayush Sharma Team Lokshahi
मनोरंजन

सलमान खानच्या 'या' चित्रपटामध्ये मेहुणा आयुषची एण्ट्री

कभी ईद कभी दिवाली चित्रपटासाठी इतक्या कोटींचे बजेट

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे लोकप्रिय अभिनेता सलमान खान (Salman Khan) आहे. सलमानचा 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali ) या चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री पुजा हेगडे (Poooja Hegde) दिसणार आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी दिसणार होते. पण आता श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी यांच्या जागी सलमानचा मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) दिसणार असल्याचे म्हटले जाते आहे. सलमान आणि आयुष हे दोघे पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या दोघांना पहिले अंतिम या चित्रपटामध्ये एकत्र काम करताना पाहिले होते.

फरहाद सामजीच्या चित्रपटामध्ये आयुष्य आणि झहीर हे सलमान खानच्या भावाची भुमिका साकारणार आहेत. तर पुजा हेगडेही सलमान खानची गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये दक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश (Venkatesh) हे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयुषने या चित्रपटासाठी पहिला नकार दिला होता. कारण हा रोल अंतिम चित्रपटाच्या भूमिकेपेक्षा मोठा नव्हता असे तो म्हणाला. पण आता आयुषने या चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा