मनोरंजन

अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’ साठी सलमान खानची खास पोस्ट

अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अंकुशने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. नुकताच अंकुशचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अंकुशने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. नुकताच अंकुशचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या खूप उत्सुकता लागली आहे. दगडी चाळ’ मध्ये ‘डॅडीं’चा विश्वासू सूर्या ‘दगडी चाळ २’मध्ये अचानक त्यांचा तिरस्कार करु लागला आहे आणि याचं कारण समजण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘दगडी चाळ २’बद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहेच यासोबत बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील या चित्रपटासाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर डेझी शाहचं ‘राघू पिंजऱ्यात आला’ हे गाणं शेअर केलं आहे. यासोबत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, दगडी चाळ २ च्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा” असे कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्री डेझी शाहने या पोस्टवर कमेंट करत सलमानचे आभार मानले आहेत.

दगडी चाळ 2 हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक