Samantha at 10 Enradhukulla Teaser Launch 
मनोरंजन

नेटकार्यांनी समंथाला केले ट्रोल, तरीही समंथा नि:शब्द

Published by : Lokshahi News

समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni) नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे आडनाव बदलले आहे. 's'याची माहिती दिली. आज पासून तिचे नाव समंथा एस (samanatha s) असे दिसेल. नाव बदलल्याने अनेक अफवा पसरल्या आहेत, की सामंथा आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya)यांच्यात सर्व काही ठीक आहे का ? सामंथा आणि चैतन्य, ज्यांना चाहत्यांनी 'चॅसम' (chaysam) म्हणून प्रसिद्ध केले ते आता वेगळे होणार का ? असा प्रश्न नेटकार्यांना पडला आहे. त्यामुळे आडनाव वगळताच अभिनेत्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले गेले.

वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सामंथा ट्रोल झाल्याबद्दल आणि ती चाहत्यांना कशी प्रतिक्रिया देते याबद्दल सगळ्याचं लक्ष वेधले होते. त्यावर तिने असे उत्तर दिले, की द फॅमिली मॅन (The Family Man)चित्रपट निर्मिती वरून ही मला ट्रोल करण्यात आले होते. अनेकांची इच्छा होती मी याविषयावर प्रतिक्रिया द्यावी, परंतु मी कधीच ट्रोल्सना उत्तरे देत नाही. त्यामुळे या विषयावरही मी काही बोलणार नाही. जेव्हा मला बोलायचे असेल आणि जेव्हा मला काहीतरी सांगायचे असेल तेव्हा मी बोलेन. सध्या 65000 ट्विट्स वर प्रतिक्रिया देणं शक्य नाही. असे ती म्हणली.

नुकताच, समंथाचा द फॅमिली मॅन 2 (The family man 2) अमेझॉन प्राइमवर (amazon prime)रिलीज झाला होता. अनेकांनी असा दावा केला होता की, शो निर्माते तमिळ लोकांचे नकारात्मक दृष्टीने चित्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, रिलीज झाल्यानंतर या शोला देशभरातील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. अलीकडेच, सामंथाला तिच्या बॉलिवूड आणि ओटीटी पदार्पणासाठी पहिला पुरस्कार मिळाला – मेलबर्नच्या ( Melbourne)भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट कामगिरी महिला पुरस्कार (Best Performance Female).

सामंथाच्या बॉलिवूड पदार्पणानंतर, चाहते हिंदी चित्रपटसृष्टीत चैतन्यच्या पदार्पणाची वाट पाहत आहेत. अभिनेता आमिर खानच्या लाल सिंह चड्ढामध्ये त्याची भूमिका पाहायला मिळणार आहे. लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha)हा आगामी कॉमेडी-ड्रामा ( Comedy drama) चित्रपट आहे. जो अद्वैत चंदन (Advait Chandan) दिग्दर्शित एरिक रोथ (Eric Roth) आणि अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni)यांनी लिहिलेली पटकथा आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन (Aamir Khan Productions), वायाकॉम 18 स्टुडिओ (Viacom18 Studios) आणि पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures) यांनी केली आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात आमिर खान (amir khan), करीना कपूर(Kareena Kapoor) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?