Samantha & Ayushman Team Lokshahi
मनोरंजन

Samantha & Ayushman : आयुषमानसोबत समंथा दिसणार 'या' चित्रपटात...

साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Published by : prashantpawar1

साऊथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीने आयुष्मान खुरानासोबत तिचा पहिला हिंदी चित्रपट साइन केला आहे. अभिनेत्रीला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडल्याचे बोलले जात आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'च्या सीझन 2 मधून सामंथाने डिजिटल प्लेटफॉर्मच्या माध्यमातून पदार्पण केले असले तरी लोक तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत. काही वृत्तानुसार चित्रपट निर्मात्यांनी सध्या सर्व गोष्टी लपवून ठेवल्या आहेत. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस शूट केला जाईल आणि 2023 च्या उत्तरार्धात प्रदर्शित होईल. विनोद आणि नाटकासोबतच सस्पेन्सही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. रिपोर्ट्समध्ये असंही सांगण्यात येत आहे की समंथाने तिचा दुसरा हिंदी चित्रपटही साइन केला आहे. हे एक पौराणिक महाकाव्य असल्याचे सांगितले जाते ज्याचे शूटिंग 2023 मध्ये सुरू होणार आहे. सामंताने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.

समंथा ही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सर्वाधिक शुल्क आकारणाऱ्या यादीत सामंथाचे नाव हे पहिल्या क्रमांकावर आहे. 'पुष्पा' चित्रपटातील प्रसिद्ध आयटम नंबर 'ऊ अंतवा'साठी समंथाने पाच कोटी रुपये घेतले होते. समंथाने साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केले. आणि त्यानंतर ते दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा