मनोरंजन

Samay Raina Indias Got Latent show: युट्यूबर समय रैनाने आपलं म्हणणं मांडलं, "जे काही घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी..."

समय रैनाचा 'इंडियाज गॉट लॅटेंट' शो वादात, रणवीर अलाहबादियाच्या वक्तव्यामुळे संतप्त प्रतिक्रिया, समय रैनाने इन्स्टा पोस्टमधून व्यक्त केल्या भावना.

Published by : Prachi Nate

प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच त्याचा नवीन एपिसोड समोर आला आहे. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह व रणवीर अलाहबादिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी राणवीर अलाहबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

या कार्यक्रमामध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून समय रैनासह अनेकांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं आहे.

याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या वादावर समय रैनाने भाष्य करत इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ त्याच्या चॅनलवरून काढून टाकल्याचे म्हटलं आहे. या सगळ्या वादावर समय रैनाने मौन सोडलं आहे. इन्स्टा पोस्टमधून समय रैनानं आपलं म्हणणं मांडलं आहे.

समय रैनाने इन्स्टाग्राम स्टोरी

समय रैनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे की, "हे सर्व घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. मी माझ्या चॅनलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा हेच माझे ध्येय होते. मी तपास यंत्रणांना सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास निष्पक्षपणे होईल. धन्यवाद," असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा