मनोरंजन

संगीता बिजलानीची कमेंट चर्चेत; सलमान खान चाय शर्टलेस फोटो वर

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानचे जगभरात लाखो चाहते आहेत . तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतच सलमानने सोशल मीडियावर त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोवर सलमानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री संगीता बिजलानी हिने कमेंट केली आहे. त्यामुळे हा फोटो प्रचंड चर्चेत आहे.

तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच सलमानने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सलमान शर्टलेस असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत सलमानची फिटनेस, अॅब्स हे देखील पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी सलमानने त्याच्या बिईंग ह्युमन या संस्थेची टोपी परिधान केली आहे .

हा फोटो शेअर करताना सलमान म्हणाला, 'ही बिईंग ह्युमनची टोपी चांगली आहे ना…!' अशा आशयाची कॅप्शन त्याने दिली आहे. त्याच्या या फोटोला नेटकरी पसंती देताना दिसत आहे. यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे. सलमानच्या या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटले, "सलमान काय गंमत करतोस का? तू शर्टलेस असताना त्या टोपीकडे कोणत्या मुर्खाचे लक्ष जाणार आहे." तर एक नेटकरी म्हणाला, "टोपी ही फक्त शरीर दाखवण्याचे निमित्त आहे."

दरम्यान सलमानच्या चाहत्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनी यावर कमेंट केली आहे. विशेष म्हणजे सलमानची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची कमेंट केली आहे. तिची ही कमेंट प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. संगीताने सलमानच्या या फोटोखाली फायर इमोजी शेअर केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा