मनोरंजन

Sara Ali Khan : सिक्यूरिटी गार्डच्या कृत्यामुळं सारा अली खानला मनस्थाप

Published by : Lokshahi News

अभिनेत्री सारा अली खानचा 'अतरंगी रे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील 'चका चक' हे गाण प्रदर्शित झाले. या गाण्याच्या लाँच इव्हेटचा साराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा इव्हेंटला आलेल्या लोकांची माफी मागताना दिसत आहे.

साराच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत की, ती इव्हेंटमधून बाहेर जात आहे, तिच्या आजूबाजूला बरेच फोटोग्राफर आणि सिक्यूरिटी गार्डस् आहेत . एका गार्डने फोटोग्राफरला धक्का दिल्याने सारा सर्व फोटोग्राफर्सची माफी मागते आणि गार्डला विचारते, 'तुम्ही कोणाला धक्का दिला?' तो गार्ड म्हणतो, 'कोणाला नाही' सारा म्हणते, 'ज्यांनी तुम्ही धक्का दिला ते निघून गेले. प्लिज असं करू नका कोणालाही धक्का देऊ नका.' त्यानंतर ती फोटोग्राफर्सना म्हणाली, 'सर्वांनाचे आभार आणि सॉरी.'

साराचा 'अतरंगी रे' हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धुनष हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अतरंगी रे या चित्रपटातील 'चका चक' या गाण्याचा व्हिडीओ नुकताच साराने सोशल मीडियावर शेअर केला . या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले, 'आता प्रत्येक लग्नात हे गाणं वाजणार.' हे गाणे श्रेया घोषालने गायले असून ए आर रहमान यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा