Sara tendulkar  
मनोरंजन

सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार!

Published by : Akash Kukade

भारताचा माजी खेळाडू आणि क्रिकटचा देव असलेला सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. साराने आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देखील मागे टाकलं आहे.

सारा नुकतीच मॉडलिंगमध्ये उतरली असून तिचे मॉडलिंगचे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली होती. परंतु आता सारा आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ती म्हणजे सारा बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

सारा ही सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक मानली जाते. लूक आणि स्टाइलसह साराचे आकर्षक व्यक्तिमत्त्व चाहत्यांना खूप आवडते. त्यामुळे सारा कधी बॉलिवूडमध्ये डेब्यु करतेय, याकडेच सर्वांच लक्ष लागले आहे.

सारा बॉलिवूड मध्ये येण्यास उत्सुक आहे का?

साराला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. बॉलीवूड लाइफमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले की, सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. तिला अभिनयात खूप रस आहे आणि तिने अभिनयाचे धडेही घेतले आहेत. साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकीयशास्त्रात शिक्षण घेतले आहे. मात्र, तिला ग्लॅमरच्या दुनियेत करिअर करायचे आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा