मनोरंजन

Sara Tendulkar: सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स

Published by : Team Lokshahi

Sara Tendulkar Education Qualification: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. सारा तेंडुलकरच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. आता शिक्षणामुळे सारा चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकरने मास्टर्स पूर्ण केलेय. सोशल मीडियावर पोस्ट करत तीने याबाबतची माहिती दिली. आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी सारा तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते.

सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. त्यामध्ये तीने आपण मास्टर्स पूर्ण केल्याचे सांगितलं. निकालाचा दिवस... असे कॅप्शन टाकत साराने फोटो पोस्ट केलाय. सारा तेंडुलकरच्या निकालाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ मुंबई येथे झालं आहे. यानंतर साराने उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला. सारा तेंडुलकरने लंडनमध्ये ‘कॉलेज ऑफ लंडन’येथे वैद्यकशास्त्रातून (Medicine) मास्टर्स पूर्ण केलेय. नुकताच विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. सारा तेंडुलकर या कोर्समध्ये 75 टक्क्यांहून (डिस्टिंक्शन) अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झालेली आहे. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे.

दरम्यान, साराची आई अंजली तेंडुलकर देखील प्रोफेशनल डॉक्टर आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त गेल्या काही वर्षात साराने मॉडेलिंग क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. शुभमन गिल याच्यासोबत त्याचे नाव जोडले जाते. सोशल मीडियावर त्यांच्या अफेअयरच्या चर्चा वारंवार चालू असतात. सारा तेंडुलकर क्रिकेट सामने पाहण्यासाठी अनेकदा क्रिकेट स्टेडियममध्ये हजर असते.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण