Shweta-Shinde - Devmanus  
मनोरंजन

‘देवमाणूस’मालिकेचा दुसरा सीझन येणार?

Published by : Lokshahi News

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'देवमाणूस'ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. 'देवमाणूस' या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग काल (15 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. हा भाग अधांतरी सोडलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग येणार का? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. मालिकेत प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र, या मालिकेचा दुसरा सीझन येणार का? आणि आला तर कधी येणार?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याच दरम्यान या मालिकेची निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

पाहा काय म्हणाली श्वेता शिंदे?
'16 ऑगस्ट 2020 ला ऐन पॅनडामिकमध्ये वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस' या नव्या पर्वाला सुरुवात झाली. पाहता-पाहता एक वर्ष सरलं… गेले एक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेचा काल शेवटचा भाग प्रदर्शित झाला. रात्री 10.30च्या स्लॉटला असून सुद्धा सर्व मराठी मालिकांमध्ये नंबर वन राहण्याचा इतिहास या मालिकेने रचला ते केवळ मालिकेवर असीम प्रेम करणाऱ्या आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांमुळे. यासाठी आपले सर्वांचे शतशः आभार.'

पाहा पोस्ट :

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसे नेत्यांची बैठक

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवा, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार