मनोरंजन

परिणीती चोप्रा वाढदिवस पाहा खास फोटो

Published by : Lokshahi News

चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज (22 ऑक्टोबर) 33वा वाढदिवस आहे. तिचा जन्म हरियाणाच्या अंबाला येथे झाला. सध्याच्या काळात चित्रपट सृष्टीत सुप्रसिद्ध नाव कमावलेल्या परिणीतीला लहानपणापासूनच चित्रपट जगात जाण्याची आवड होती . खरं तर ती एक हुशार विद्यार्थिनी होती आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून, करिअर घडवण्याच्या दिशेने ती काम करत होती. परीने चित्रपट जगतात प्रवेश केला.
अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देऊन हुशार परिणीती चोप्रा 12 वीमध्ये वर्गात आणि देशात अव्वल आली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान देखील झाला. यानंतर तिने अर्थशास्त्र, व्यवसाय आणि वित्त विषयात पदवी मिळवली .

2009 मध्ये जेव्हा मंदी आली तेव्हा परी गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करत होती आणि या मंदीमुळे तिला आपली नोकरी गमवावी लागली.


परिणीतीचा रणवीर सिंहसोबतचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही. पण तिने पुढे बराच काळ आपली पुढची वाटचाल केली होती . परिणीतीच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. अर्जुन कपूरचा दुसरा चित्रपट "इश्कजादे "यशस्वी झाला .

तिने 'मेरी प्यारी बिंदू', 'गोलमाल अगेन', 'नमस्ते लंडन', 'केसरी', 'जबरिया जोडी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय काही चित्रपटांचे काम आता सुरु आहे. नुकतेच तिचे 'संदीप और पिंकी फरार', 'द गर्ल ऑन द ट्रेन' आणि 'सायना' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश