मनोरंजन

पाहा कोण आहे अभिनेत्री श्वेता शिंदेचा पती

Published by : Lokshahi News

जाणून घ्या अभिनेत्री श्वेता शिंदेच्या नवऱ्याविषयी काही खास गोष्टी छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणजे अभिनेत्री श्वेता शिंदे. मराठी-हिंदी मालिकांमधून श्वेता शिंदे हे नाव आज घराघरात पोहोचले आहे.

'अवंतिका', 'अवाघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदेने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.


श्वेता शिंदेने मिळालेल्या भूमिकेला न्याय दिला. तिने वठवलेली नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. 'लागीर झालं जी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस या मालिकांची यशस्वी निर्मिती केली.


मालिका निर्मिती बरोबर श्वेता शिंदे वेगवेगळया भूमिकांमधून दमदार अभिनय करत आहे.'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याचवर्षांनी श्वेता शिंदे छोटया पडद्याकडे वळली होती.


बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद' आणि आणखी काही सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने काम केले आहे.
मालिका, चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून श्वेता शिंदेने कधीही मागे वळून पाहिलेले नाही

अपराधी कौन' या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप भन्साळीची ओळख झाली होती.
मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर २००७ साली दोघे विवाहबद्ध झाले.

संदीप भन्साळीने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.लग्न आणि मूल झाल्यानंतर श्वेता शिंदेने काही काळासाठी फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता.

(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे / इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा