मनोरंजन

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान बनला श्रीमंतीत ही अव्वल! देशातील सर्वात श्रीमंताच्या यादीत किंग खान पहिल्या नंबरवर

संपूर्ण बॉलिवूडमध्ये ज्याचे चित्रपट आज ही धुमाकूळ घालत आहे असा बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. नवनवीन विक्रम रचत असताना शाहरुख खानने आणखी एक विक्रम रचला आहे.

Published by : Team Lokshahi

संपूर्ण बॉलिवूडमध्ये ज्याचे चित्रपट आज ही धुमाकूळ घालत आहे असा बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. शाहरुख खान हा बॉलिवूडचा तो सुपरस्टार आहे ज्याचे 90 च्या दशकातील तसेच सध्याचे चित्रपटही सुपरहिट झाले आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या ही भारतासह इतर देशातही मोठ्या प्रमाणात आहे. शाहरुख खानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत नेहमी विक्रम रचला आहे. शाहरुख खानचे परदेशात त्याच्या मुद्रेत नाणे देखील तयार केले आहेत.

तर परदेशात पुतळा तयार होणार शाहरुख खान हा भारतातील पहिला अभिनेता आहे. नवनवीन विक्रम रचत असताना शाहरुख खानने आणखी एक विक्रम रचला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 ची यादी जाहीर झाली आहे आणि त्यादरम्यान देशातील श्रीमंताच्या यादीत प्रवेश करत अभिनेता शाहरुख खानेन सेलिब्रिटींच्या मालमत्तेत पहिल्या नंबरवर स्थान मिळवल आहे. देशातील श्रीमंताच्या यादीत सुमारे 150 कोटी भारतीयांपैकी केवळ 1539 लोकांना स्थान मिळाले आहे.

या यादीत जुही चावला, अमिताभ बच्चन, करण जोहर, हृतिक रोशन तसेच सलमान खान, अक्षय कुमार आणि आमिर खान यांसारख्या सेलिब्रिटींना मागे टाकतं, पहिल्या नंबरवर स्थान मिळवण्यात शाहरुख खानला यश आलं आहे. शाहरुख खान चित्रपटांसोबतच इतर व्यवसायांतूनही कमाई करतो. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तो मालक आहे. यासर्व कामाईतून आता शाहरुख खान 7300 कोटी मालमत्तेचा मालक आहे.

त्याचसोबत 'मुफासा: द लायन किंग' या आगामी चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह त्याची दोन्ही मुले आर्यन आणि अबराम यांनी देखील पहिल्यांदाच आवाज दिला आहे. 'मुफासा: द लायन किंग'च्या हिंदी व्हर्जनसाठी शाहरुखने मुफासाच्या पात्राला आवाज दिला आहे, तर आर्यनने सिम्बाच्या पात्राला आवाज दिला आहे, तसेच अबराम याने यंग मुफासाच्या पात्राला आवाज दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Mahua Moitra On Amit Shah : "अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे"; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त वक्त्तव्य

BCCI India vs Pakistan : "तर मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो..." पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना व्हावा की नाही? माजी भारतीय खेळाडूच्या मताने वेधल लक्ष

Manoj Jarange Patil : मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, जरांगेंनी ठणकावलं