मनोरंजन

Shah Rukh Khan: सोन्याच्या नाण्यावर किंग खानचे चित्र, पॅरिसमधील म्युझियमकडून हा सन्मान मिळवणारा शाहरुख खान ठरला एकमेव बॉलिवूड स्टार

संपूर्ण बॉलीवूडमध्ये ज्याचे चित्रपट आज ही लोकं तितक्याच आवडीने पाहतात. शाहरुख खान आता परदेशात ही आपली छाप आणि नाव उमटू लागला आहे.

Published by : Team Lokshahi

संपूर्ण बॉलीवूडमध्ये ज्याचे चित्रपट आज ही लोकं तितक्याच आवडीने पाहतात. असा बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान नेहमी कोणत्या तरी गोष्टातून चर्चेत येतो. पैसा, चाहते, नाव या कोणत्याच गोष्टीची ज्याला कमी नाही असा शाहरुख खान आता परदेशात ही आपली छाप आणि नाव उमटू लागला आहे. परदेशातून आता शाहरुख खानच्या मस्तकावर एक अनोखा असा मानाचा मुकुट लावला जाणार आहे.

आजवर शाहरुख खानने अनेक पुरस्कार मिळवले प्रत्येक पुरस्कारावर आपले नाव कोरले. शाहरुख खान भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने सन्मानित झाला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आज शाहरुख खान हे नाव ओळखले जाते. आता शाहरुख खानने आणखी एक मोठी कामगिरी नोंदवली जाणार आहे. शाहरुख खानचे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असणारे प्रसिद्ध ग्रेविन म्युझियममध्ये शाहरुखच्या नावाचे सोन्याचे नाणे आहे, ज्यावर शाहरुख खानचे चित्र आणि नावही छापलेले आहे.

हे नाणे 2018 मध्ये रिलीज झाले होते, यादरम्यान शाहरुख खानच्या एका चाहत्याने या नाण्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच या म्युझियममध्ये शाहरुख खानचा मेणाचा पुतळाही बसवण्यात आला आहे. ही गोष्ट देशासाठी गर्वाची असली तरी भारतात असलेले किंग खानचे चाहते अभिमानाने भरून आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड