मनोरंजन

५० महान अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानचे नाव; ठरला एकमेव भारतीय अभिनेता

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरले आहे यात शंका नाही.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरले आहे यात शंका नाही. जगभरातील प्रेक्षकांचे या अभिनेत्यावर प्रेम असून, त्याचा सम्मान करतात. तसेच, आपल्या अभिनय कौशल्याने तसेच उत्कृष्ट स्क्रीन प्रेझेन्स आणि नम्रतेने शाहरुख खानने वेळोवेळी प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. अशातच, जगातील सर्वात अग्रगण्य मॅगझिन्सपैकी एकाने आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीत स्थान मिळवणारा शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे.

नुकतीच ही यादी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत या मॅगझीनने आतापर्यंतच्या टॉप 50 महान अभिनेत्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी लिहिले, एम्पायरची 50 महान अभिनेत्यांची यादी जाहीर. Empire's list of the 50 greatest actors of all time – revealed! As celebrated in our brand new issue, and voted for by you."

या यादीमध्ये आतापर्यंतच्या 50 महान अभिनेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, ज्यामध्ये शाहरुख खान हा एकमेव भारतीय अभिनेता आहे. याशिवाय या यादीत डेन्झेल वॉशिंग्टन, टॉम क्रूझ, फ्लॉरेन्स प्यू आणि टॉम हँक्स या अभिनेत्यांचादेखील समावेश आहे. अशातच, सध्या शाहरुख खान जानेवारीमध्ये 'पठाण' आणि त्यानंतर 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटांच्या रिलीजसाठी तयारी करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली