मराठी मालिकेसह, राजकिय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले अभिनेता किरण माने Kiran Mane पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.यावेळी चर्चेत येण्यासाठी कुठला वाद झाला नाही. मात्र त्यांने एनसीबीविरोधात अतिशय खरमरीत पोस्ट लिहली आणि शाहरुखचं (Shahrukh Khan) समर्थन केले आहे. नेमकी त्याने पोस्ट काय केली आहे ती पाहूयात…
आर्यनबाबत एनसीबी काय म्हणाले ?
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खानविरोधात (Aryan khan) पुरावे नसल्याचं ठरवणं हे घाईचं होईल, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने स्पष्ट केलं आहे. आर्यन हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबी प्रमुखांनी स्पष्टीकरण दिलं. त्यावरूनच किरण माने (Kiran Mane) यांनी ही पोस्ट लिहिली आहे. यावरून पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.