मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुखानने दिले अनंत आणि राधिकाला लग्नाचे 'हे' आहेर, किंग खानने दिलेल्या या गिफ्टची सर्वत्र चर्चा

12 जुलैला झालेल्या अंनत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाची चर्चा तर अजूनही चालूच आहे. यांचे लग्न हे भव्यदिव्य पद्धतीने पार पडलेले लग्न होते. किंग खानने म्हणजेच शाहरुखानने दिलेल्या गिफ्टची चर्चा मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरलेली दिसत आहे.

Published by : Team Lokshahi

12 जुलैला झालेल्या अंनत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाची चर्चा तर अजूनही चालूच आहे. यांचे लग्न हे भव्यदिव्य पद्धतीने पार पडलेले लग्न होते. यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग शुटपासून ते लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात अनेक खेळाडू, कलाकार, बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार, अभिनेते तसेच नेत या प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांनी आपली उपस्थिती दाखवली होती. संगीत कार्यक्रमापासून ते हळदी समारंभ आणि लग्नसोहळ्यात सलमान खान आणि शाहरुखान यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

अंनत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नादरम्यान अनेक लोकांनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ज्यामध्ये बच्चन परिवाराकडून या जोडप्याला 30 कोटींचा हिऱ्याचा हार देण्यात आला. तसेच आलिया आणि रणबीरने 9 कोटींची मर्सिडीज गिफ्ट केली. तर तर सलमान खानने 15 कोटींची बाईक दिली. त्याचसोबत दीपिका पदुकोण आणि रणबीरने 20 कोटींची रोल्स रॉयल्स गिफ्ट केली होती. यादरम्यान किंग खानने म्हणजेच शाहरुखानने दिलेल्या गिफ्टची चर्चा मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरलेली दिसत आहे.

शाहरुखानने दिलेलं गिफ्ट हे खूप महाग आणि विशेष होत. शाहरुखानने अंनत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नानिमित्त 40 कोटींचे घर दिलं. या नवदाम्पत्याला दिलेलं हे भव्य आणि आलिशान घर भारतात नसून ते फ्रान्समध्ये घेतलेले आहे. शाहरुखानने दिलेलं हे गिफ्ट खास आणि विशेष असल्याचे दिसत आहे. यावरून अंबानी कुटुंबासोबत शाहरुखानचं जवळचं नातं असल्याचे दिसून येते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara News : आश्चर्यचकित! साताऱ्यातील एका मातेने दिला ७ मुलांना जन्म, नेमकं प्रकरण काय?

Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...

Latest Marathi News Update live : आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा